मुख्य सामग्रीवर वगळा

गुळवेलीचे सेवन करा रोगप्रतिकार शक्ती वाढवा

 


गुळवेलीचे मराठी नाव 'गुळवेल'च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार 'गुडची' 'गरोळ' आणि 'गरुड'ही गुळवेलची आणखी काही नावं आहेत. या वनस्पतीचं कंद आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. मात्र या वनस्पतीची पानंही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरीन गिलोइन, गिलोनीन रासायनिक गुणद्रव्यं आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानात आलेला आहे. 


या वनस्पतीचं खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असतं. या अनोख्या गुणधर्मामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये वनस्पतीचा उपयोग केला जातो. कुठलीही व्याधी अशी नाही जी गुळवेलीमुळे बरी झाली नाही. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्यादींमध्ये गुळवेलीचा उपयोग केला जातो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.
         गूळ वेल ही सहज उपलब्ध होते, रानात झाडांचा आधार घेऊन ही वनस्पती वाढते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आष्टीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर महादेव मंदिर

             आष्टी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर, हे खुप पुरातन असे मंदिर असून पूर्ण पणे दगडी बांधकाम केलेले आहे .         मंदिराच्या समोर जुने पिंपळाचे झाड असून यावरूनच मंदिराला पिंपळेश्वर असे नाव पडले आहे जाणकार  सांगतात .        मंदिराच्या समोर निजाम कालीन जल कुंड आहे याच्या भिंतीचे बांधकाम दगड आणि चुन्यात केलेले आहे. मंदिरात जुनी महादेवाची पिंड आहे. भक्तांची येथे कायमच गर्दी असते. तसेच महाशिवरात्री ला येथे दरवर्षी यात्रा भरत असते.          पाहण्यास असे उत्तम स्थळ आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्याने तलाव ओसंडून वाहत आहे.

गडभ्रमंती

  कोल्हापूर :   पाठीवर सॅक, पायात बूट अन्‌ अंगावर घामाच्या धारा घेऊन गड सर करायचा. गडाची माती कपाळाला लावायची. तिथल्या वास्तूंवर नजर टाकायची. बाराबंदीचा पोशाख अंगावर चढवायचा. डोक्‍यावर फेटा बांधायचा. पाठीला ढाल अडकवायची अन्‌ कपाळाला चंद्रकोर लावून मावळ्याच्या वेशात गड धुंडाळायचा. या वेगळ्या छंदातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार इतिहासवेड्या युवकांची वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली आहे. गडभ्रमंतीतून 'हिस्टॉरिकल टच' फोटो काढण्याचा त्यांचा छंद 'आम्हीच ते इतिहासवेडे'चा संदेश देऊ लागला आहे. सुजीत जाधव, स्वप्नील नाळे, योगेश रोकडे व अाप्पासाहेब रेवडे ही या तरुणांची नावे. सुजीत जाधव सुजीत जाधव मूळचा कसबा बावड्यातला.सह्याद्री प्रतिष्ठानचा सदस्य. मर्दानी खेळात तो तरबेज आहे. विशेषत: दुहाती पट्टा फिरविण्यात त्याचे कौशल्य आहे. शंभराहून अधिक किल्ले त्यांने पालथे घातले आहेत. गडावर जाताना तो बाराबंदी पोशाख, ढाल, कडे, कवड्याच्या माळा घेऊनच जातो. रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या पालखी सोहळ्यातही त्याचा सहभाग असतो. स्वप्नील एकनाथ नाळे सांगरूळ ब्रॅंडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वप्नील एकनाथ नाळे या...