आष्टी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर, हे खुप पुरातन असे मंदिर असून पूर्ण पणे दगडी बांधकाम केलेले आहे .
मंदिराच्या समोर जुने पिंपळाचे झाड असून यावरूनच मंदिराला पिंपळेश्वर असे नाव पडले आहे जाणकार सांगतात.
मंदिराच्या समोर निजाम कालीन जल कुंड आहे याच्या भिंतीचे बांधकाम दगड आणि चुन्यात केलेले आहे. मंदिरात जुनी महादेवाची पिंड आहे. भक्तांची येथे कायमच गर्दी असते. तसेच महाशिवरात्री ला येथे दरवर्षी यात्रा भरत असते.
पाहण्यास असे उत्तम स्थळ आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्याने तलाव ओसंडून वाहत आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा