कोल्हापूर : पाठीवर सॅक, पायात बूट अन् अंगावर घामाच्या धारा घेऊन गड सर करायचा. गडाची माती कपाळाला लावायची. तिथल्या वास्तूंवर नजर टाकायची. बाराबंदीचा पोशाख अंगावर चढवायचा. डोक्यावर फेटा बांधायचा. पाठीला ढाल अडकवायची अन् कपाळाला चंद्रकोर लावून मावळ्याच्या वेशात गड धुंडाळायचा. या वेगळ्या छंदातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार इतिहासवेड्या युवकांची वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली आहे. गडभ्रमंतीतून 'हिस्टॉरिकल टच' फोटो काढण्याचा त्यांचा छंद 'आम्हीच ते इतिहासवेडे'चा संदेश देऊ लागला आहे. सुजीत जाधव, स्वप्नील नाळे, योगेश रोकडे व अाप्पासाहेब रेवडे ही या तरुणांची नावे.
सुजीत जाधव
सुजीत जाधव मूळचा कसबा बावड्यातला.सह्याद्री प्रतिष्ठानचा सदस्य. मर्दानी खेळात तो तरबेज आहे. विशेषत: दुहाती पट्टा फिरविण्यात त्याचे कौशल्य आहे. शंभराहून अधिक किल्ले त्यांने पालथे घातले आहेत. गडावर जाताना तो बाराबंदी पोशाख, ढाल, कडे, कवड्याच्या माळा घेऊनच जातो. रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या पालखी सोहळ्यातही त्याचा सहभाग असतो.
स्वप्नील एकनाथ नाळे
सांगरूळ ब्रॅंडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वप्नील एकनाथ नाळे याच्यावर आहे. आठवीला असताना त्याचा इतिहास विषयक कार्यात प्रवेश झाला. कोपार्डेतील स. ब. खाडे महाविद्यालयातून त्याने बी. ए. ची. पदवी मिळवली. आजवर ३५ गडकोटांची त्यांनी भटकंती केली आहे. फेसबूकद्वारे गडावरील माहिती ऑनलाईन देण्याचा उपक्रम आहे.
योगेश सुरेश रोकडे
भोसलेवाडीत राहतो. तो कोल्हापूर अर्बन बॅंकेत क्लार्क आहे. विवेकानंद महाविद्यालयातून त्याने बी.ए.ची. पदवी मिळवली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कसबा बावड्यातील शिवकालीन युद्धकला केंद्राचा तो विद्यार्थी. तेथून त्याच्यात इतिहासाचे वेड भिनत गेले. सध्या तो शिवशक्ती प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष आहे. मर्दानी खेळाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.आप्पासाहेब धुळाप्पा रेवडे
आ
प्पासाहेब धुळाप्पा रेवडे करवीर तालुक्यातल्या खुपिरेचा. खांद्यावर घोंगडे, धोतर, डोक्यावर फेटा, हातात कुऱ्हाड घेतलेले याने गडकोटावर फोटो काढले आहेत. कुडित्रेतल्या श्रीराम कॉलेजचा तो विद्यार्थी. गावातल्या प्राथमिक कुमार विद्यामंदिरात असतानाच त्याला इतिहास विषयाची गोडी लागली.अाप्पासाहेब धुळाप्पा रेवडे करवीर तालुक्यातल्या खुपिरेचा. खांद्यावर घोंगडे, धोतर, डोक्यावर फेटा, हातात कुऱ्हाड घेतलेले याने गडकोटावर फोटो काढले आहेत. कुडित्रेतल्या श्रीराम कॉलेजचा तो विद्यार्थी. गावातल्या प्राथमिक कुमार विद्यामंदिरात असतानाच त्याला इतिहास विषयाची गोडी लागली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा