महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामी १२व्या शतकात भारत भ्रमंती करत असताना
गावोगावी उपदेश करत आणि रात्री त्या गावी मुक्कामास राहत. चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास राहिले ते स्थान आज पंथाचे अनुयायी पवित्र स्थळ मानतात.
असेच फिरत असताना चक्रधर स्वामी आष्टी या गावी आले आणि रात्री आष्टी चे त्या काळी असलेले पाटील हरीचंद्र पाटलांच्या वाड्यावर मुक्कामास राहिले. आज हे ठिकाण महानुभव पंथाचे पवित्र असे ठिकाण आहे.
येथील पाटील असलेले निवृत्ती पवार यांनी त्यांचा वाडा आणि जागा मंदिर बांधण्यासाठी उपलब्ध करून दिले. मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे .२०१० सा ली शासनाचा विकास निधी प्राप्त झाला आणि मंदिराचे बांधकाम झाले.
मंदिरात भक्तनिवास, मंदिरास कंपाऊंड इत्यादी कामे करण्यात आली.
भक्तांचे येथे कायमच येणे जाणे असते. कृष्ण जन्माष्टमी ला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा