मुख्य सामग्रीवर वगळा

कोरफडीचा आयुर्वेदिक उपयोग

 


कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते.

* कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचाा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो. दम्याने मुलांचे पोट उडते. त्यावर कोरफडीच्या रसात तूप व मध घालून वारंवार चाटवावे. दम कमी होतो. पोट उडणे थांबते.
* रोज बारीक ताप, भूक न लागणे, वजन कमी होत जाणे, थकवा वाढत जाणे यावर मध आणि पिंपळी चूर्णातून कोरफड रसाचा खूपच चांगला उपयोगा होतो.
* यकृत-प्लीहा वाढणे (लिव्हर व स्पलीन) तसेच जलोदर यांसारख्या जुनाट व भयंकर व्याधीतही कोरफड अत्यंत उपयोगी आहे.
* नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
* डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.
* कोरफडाच्या गरापासून बनविलेला ‘काळा वोळ’ हा स्त्रियांच्या पाळीच्या विकारांत अत्यंत गुणकारी आहे


First

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महानुभवांचे तीर्थक्षेत्र आष्टी चे कृष्णमंदिर

              महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामी १२व्या शतकात भारत भ्रमंती करत असताना  गावोगावी उपदेश करत आणि रात्री त्या गावी मुक्कामास राहत. चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास राहिले ते स्थान आज पंथाचे अनुयायी पवित्र स्थळ मानतात. असेच फिरत असताना चक्रधर स्वामी आष्टी या गावी आले आणि रात्री आष्टी चे त्या काळी असलेले पाटील हरीचंद्र पाटलांच्या वाड्यावर मुक्कामास राहिले. आज हे ठिकाण महानुभव पंथाचे पवित्र असे ठिकाण आहे.              येथील पाटील असलेले निवृत्ती पवार यांनी त्यांचा वाडा आणि जागा मंदिर बांधण्यासाठी उपलब्ध करून दिले.   मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे .२०१० सा ली शासनाचा विकास निधी प्राप्त झाला आणि मंदिराचे बांधकाम झाले. मंदिरात भक्तनिवास, मंदिरास कंपाऊंड इत्यादी कामे करण्यात आली. भक्तांचे येथे कायमच येणे जाणे असते. कृष्ण जन्माष्टमी ला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आष्टीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर महादेव मंदिर

             आष्टी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर, हे खुप पुरातन असे मंदिर असून पूर्ण पणे दगडी बांधकाम केलेले आहे .         मंदिराच्या समोर जुने पिंपळाचे झाड असून यावरूनच मंदिराला पिंपळेश्वर असे नाव पडले आहे जाणकार  सांगतात .        मंदिराच्या समोर निजाम कालीन जल कुंड आहे याच्या भिंतीचे बांधकाम दगड आणि चुन्यात केलेले आहे. मंदिरात जुनी महादेवाची पिंड आहे. भक्तांची येथे कायमच गर्दी असते. तसेच महाशिवरात्री ला येथे दरवर्षी यात्रा भरत असते.          पाहण्यास असे उत्तम स्थळ आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्याने तलाव ओसंडून वाहत आहे.

गडभ्रमंती

  कोल्हापूर :   पाठीवर सॅक, पायात बूट अन्‌ अंगावर घामाच्या धारा घेऊन गड सर करायचा. गडाची माती कपाळाला लावायची. तिथल्या वास्तूंवर नजर टाकायची. बाराबंदीचा पोशाख अंगावर चढवायचा. डोक्‍यावर फेटा बांधायचा. पाठीला ढाल अडकवायची अन्‌ कपाळाला चंद्रकोर लावून मावळ्याच्या वेशात गड धुंडाळायचा. या वेगळ्या छंदातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार इतिहासवेड्या युवकांची वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली आहे. गडभ्रमंतीतून 'हिस्टॉरिकल टच' फोटो काढण्याचा त्यांचा छंद 'आम्हीच ते इतिहासवेडे'चा संदेश देऊ लागला आहे. सुजीत जाधव, स्वप्नील नाळे, योगेश रोकडे व अाप्पासाहेब रेवडे ही या तरुणांची नावे. सुजीत जाधव सुजीत जाधव मूळचा कसबा बावड्यातला.सह्याद्री प्रतिष्ठानचा सदस्य. मर्दानी खेळात तो तरबेज आहे. विशेषत: दुहाती पट्टा फिरविण्यात त्याचे कौशल्य आहे. शंभराहून अधिक किल्ले त्यांने पालथे घातले आहेत. गडावर जाताना तो बाराबंदी पोशाख, ढाल, कडे, कवड्याच्या माळा घेऊनच जातो. रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या पालखी सोहळ्यातही त्याचा सहभाग असतो. स्वप्नील एकनाथ नाळे सांगरूळ ब्रॅंडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वप्नील एकनाथ नाळे या...